राजकारण / महाराष्ट्र कुणापुढेही झुकणार नाही, अडीच वर्षे मुख्यंमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला - संजय राऊत

संभाजी भिडेंना उद्धव ठाकरे न भेटण्यावर संजय राऊत यांनी दिले हे उत्तर 

Nov 08,2019 10:39:53 AM IST

मुंबई - महाराष्ट्र कुणापुढेही झुकणार नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला असे संजय राऊत यांनी भाजपला ठामपणे सांगितले आहे. तत्पूर्वी संभाजी भिडे मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र उद्धव यांनी ही भेट नाकारली. यावर भाजप-शिवसेना चर्चेत मध्यस्थींची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी शु्क्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाहीये. भाजप आणि शिवसेना दोघेही मुख्यंमंत्री पदासाठी अडून बसले आहेत.


काळजीवाहू मुख्यंमंत्रीपदासाठी राजकारणाचे डावपेच सुरू, बहुमत असेल तो आपला मुख्यमंत्री बनवेल. दरम्यान महाराष्ट्रात आता कर्नाटक पॅटर्न राबवण्यात येईल असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. तर शिवसेना आपल्या मुख्यंमंत्रीपदासंदर्भात भूमिकेवर ठाम आहे. अडीच वर्षे मुख्यंमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला. मुख्यंमंत्रीपदाबाबत लेखी घेऊन भाजप नेत्यांनी यावे असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राने स्वाभीमानासाठी लढाई लढली आहे. महाराष्ट्र कोणापुढेही झुकला नाही. ना शरद पवार ना उद्धव ठाकरे कुणापुढे झुकणार, अडीच वर्षे मुख्यंमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला असे राऊत यावेळी म्हणाले.

X