आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shiv Sena Candidate Chandrakant Patil Will Fight Independently Against Khadse In Jalgaon

सेनेचे पाटील खडसेंविराेधात अपक्ष लढणार, काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपच्या गटाची साथ मिळू शकते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ मिळवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र खडसेंसाठी ताे भाजपकडेच राहिला तर पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी  शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव त्यांच्या गाेटातून केली जात आहे.  २०१४ मध्ये युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत खडसेंविषयी राग आहे. त्यातच खडसे व पाटील यांच्यात राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच २०१४ मध्ये पाटील हे खडसेंविराेधात उभे हाेते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्यांना मदत केली, मात्र पाटील पराभूत झाले. यंदाही खडसेंविरुद्ध सर्वांनी एकत्रित सक्षम उमेदवार द्यावा म्हणून पाटील प्रयत्नशील हाेते. तसे झाल्यास भाजपचा एक गटही त्यांना मदतीच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, एक तर राष्ट्रवादीने काेणताही नवखा उमेदवार दिल्यास त्याला शिवसैनिक मदत करण्याच्या तयारीत आहेत किंवा पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांना सगळे खडसेविराेधक मदत करतील, असेही आडाखे बांधले जात आहेत. मात्र राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी दिली तर या लढतीत शिवसेनेला रस नसेल. 

खुद्द खडसे लढणार की कन्या?
मुक्ताईनगरात एकनाथ खडसे लढणार की त्यांच्या कन्या अॅड. राेहिणी खडसे-खेवलकर याबाबतही काहीसा संभ्रम आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी मुक्ताईनगरमध्ये शिवसेना ही भाजपपुढे आव्हान निर्माण करणार असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 

खडसे नकाेत, भाजपमधूनही सूर
भूखंड घाेटाळ्याच्या आराेपांमुळे खडसेंना मंत्रिपद सोडावे लागले. खडसे पुन्हा निवडून आले तर त्यांना मंत्रिपद द्यावेच लागेल. दुसऱ्या टर्मसाठीही ते मुख्यमंत्र्यांसाठी डाेकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी ते निवडून येऊ नयेत म्हणून जिल्ह्यातील खडसेंविराेधी गट सक्रिय झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...