आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रपद दिले तरी आता माघार नाही, राज्यात मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकच विराजमान होणार - संजय राऊत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले होते. या वृत्ताचे खंडन करत मुख्यमंत्रिपदच काय आता इंद्रपद जरी दिले तरी आता माघार घेणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होईल. पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. येत्या दोन दिवसांत तुम्हाला निर्णय कळवण्यात येणार असल्याचे सुचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने स्वाभीमानाने हा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीद्वारे राज्याला मजबूत आणि कणखर नेतृत्व मिळणार असल्याचे राऊत म्हणाले. कुणीही या राज्याची कुंडली बदलू शकत नाही 


राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. दिल्ली आणि राज्यात बसून महाराष्ट्राची कुंडली बदलण्याचा अनेकांनी विचार केला होता. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. कुणीही या राज्याची कुंडली बदलू शकत नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मातीतील नेते आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण आणि सामाजिक कार्य दोन्हीही केल्याचे संजय राऊत म्हणाले. 

इंद्रपद सिंहासन जरी दिले घेणार नाही


दरम्यान भाजपच्या एका नेत्याने मातोश्रीवर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त लोकसत्ता दैनिकाने प्रकाशित केले होते. यावर भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी या वृत्ताचे खंडन केले. आता जर कोणी काही ऑफर देत असेल तर त्यांच्या ऑफरचा कालावधी संपला असल्याचे ते म्हणाले. आता मुख्यमंत्री पदच काय इंद्रपद जरी दिले तरी आता माघार घेणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...