सत्ता संघर्ष / गोडं बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

फडणवीसांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर 4.30 वा पत्रकार परिषद घेतली

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 06:58:52 PM IST

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्यासमोर कधीच 50-50 सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषद बोलावली. यात त्यांनी भाजपची पोलखोल केली. अमिहत शहांच्या उपस्थितीत 50-50 चार फॉर्म्युल ठरला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे...

> गेल्या पाच वर्षात आम्ही विकासाच्या आड आलो नाहीत


> पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप


> कोण खोट आणि कोण खरं हे जनतेला माहित आहे


> मी दिल्लीला गेलो नाही, अमित शहा आणि फडणवीस आमच्याकडे आले


> राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा व्यक्ती असेल, असे मी बाळासाहेबांना वचन दिले आहे


> देवेंद्र फडणवीस होते म्हणून मी 2014 ला पाठींबा दिला


> गोडं बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केलाय


> मी भाजपला शत्रु मानत नाही, पण भाजपने खोटं बोलू नये


> अवजड उद्योगाचं खात आमच्या माथी मारलं


> मोदींच आणि माझं भावा-भावाच नातं आहे

> चुकीच्या माणसांसोबत गेल्याचे दुख:


> शब्द देऊन फिरवण्याची भाजवची वृत्ती


> संघाबाबत मनात आदर आहे


> खोटेपणाच नातं मला ठेवायचं नाही


> भाजपने सत्ता स्थापन करावी, नाहीतर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत

X
COMMENT