Maharashtra Special / शिवसेनेची 'नेटफ्लिक्स'विरोधात पोलिसात तक्रार; हिंदू आणि भारताला बदनाम करण्याचा आरोप

तक्रारकर्त्याने नेटफ्लिक्सच्या 'सॅक्रेड गेम्स', 'लीला' आणि 'घुल'चे दिले उदाहरण

Sep 04,2019 04:11:00 PM IST

मुंबई- शिवसेनेने ऑनलाइन स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर भारत आणि हिंदूंना बदनाम केल्याचा आरोप लावला आहे. शिवसेना आयटी सेलचे सदस्य रमेश सोळंकीने नेटफ्लिक्सविरोधात मुंबईच्या एलटी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. सोळंकीने आपल्या तक्रारीत नेटफ्लिक्सच्या 'सॅक्रेड गेम्स', 'लीला' आणि 'घोल'या सीरिजचे उदाहरण दिले.


पोलिसांनी सांगितल्यानुसार, तक्रारीची कॉपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस कमिशनर यांना पाठवली आहे. नेटफ्लिक्‍स एक अमेरिकन कंपनी आहे, ही कंपनी आपल्या वेब सीरिजबद्दल नेहमीच वादात असते. नेटफ्लिक्सला सध्या भारतात खूप लोकप्रियता मिळाली आहे.

नेटफ्लिक्सचे लायसंस रद्द करण्याची मागणी
सोळंकीने सांगितले की, "नेटफ्लिक्सच्या प्रत्येक सीरीजमध्ये भारताला जागतिक स्तरावर बदनाम केले जाते. या प्लॅटफॉर्मवर हिंदू फोबियासाठी भाराताला वाईट दाखवले जाते. सगळ्या आपत्तिजनक वेब सीरीजला समोर ठेऊन योग्य ती कार्रवाई केली जावी. नेटफ्लिक्सच्या टीमला समन्स पाठवून त्यांचे लायसेंस रद्द केले जावे."

X