आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अधिकृत' बंडखाेरांना आवरा, आम्हीही तसे वागलो तर युतीचे धिंडवडे निघतील : शिवसेना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : खान्देशात शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपने उभे केलेले बंडखाेर थेट पक्षाचे नेते, चिन्ह वापरून आपण भाजपचे अधिकृत बंडखाेर असल्याचा प्रचार करत आहेत. त्यांना भाजपमधून उघड पाठिंबा मिळत असल्याचा आराेप शिवसेनेने केला. जळगावचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी भाजप नेते तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन निर्वाणीचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात चाेपडा, जळगाव ग्रामीण, पाचाेरा, पाराेळा या मतदारसंघांत भाजपचे बंडखाेर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. शुक्रवारी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे सर्वच शिवसेना उमेदवारांनी बंडखाेरांची कैफियत मांडली. सावंत यांनी लाेकसभा निवडणुकीत जिल्ह्यात युती पूर्ववत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हाेती. शुक्रवारी त्यांनी शिवसेना उमेदवारांच्या भेटी घेतल्यानंतर सायंकाळी गिरीश महाजन यांच्या नावे पत्रच काढले.


'युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी काम न करता बंडखाेरी केली आहे. या प्रकारामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. याचा अधिकृत उमेदवारांच्या मतांवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. या बंडखाेरांना समजवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपणास कळवत आहे. आपण तत्काळ दखल घेऊन बंडखाेरांना याेग्य ती समज द्यावी, अन्यथा याच मार्गाने शिवसेनेला अन्य ठिकाणी जावे लागल्यास दाेघांचेही नुकसान हाेईल व युतीचे धिंडवडे निघतील,' अशा शब्दांत सावंत यांनी सुनावले आहे.

बंडोबांना दंड : प्रमुख पक्षांनी शुक्रवारी अशी केली कारवाई
भाजप..
.
युतीच्या उमेदवाराविराेधात बंडखाेरी करणारे भाऊराव उके, रतन वासनिक, छत्रपाल तुरकर व अमित बुद्धे यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी काढले आहेत.

काँग्रेस...
आघाडीच्या उमेदवाराच्या विरुद्ध बंड करून निवडणूक लढवणारे अ. मजीद कुरेशी अ. कदीर (मलकापूर, जि. बुलडाणा) यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी दिले आहेत.

शिवसेना...
साेलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्याविराेधात बंड करणारे नेते महेश काेठे यांना शिवसेनेतून थेट निलंबित करण्यात आले.


काही उमेदवार आपण भाजपचे अधिकृत बंडखाेर असल्याचा प्रचार करत अाहेत.
जळगावात अशी आहे स्थ
िती
चाेपड्यात जि. प. समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर साेनवणे, जळगाव ग्रामीणमध्ये भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, पाराेळ्यात माजी नगराध्यक्ष गाेविंद शिराेळे, पाचाेऱ्यात अमाेल शिंदे यांनी बंडखाेरी केली आहे. हे उमेदवार आपण भाजपचे अधिकृत बंडखाेर असल्याचा प्रचार करत आहेत. प्रचारात ते भाजपच्या नेत्यांचे फाेटाेही वापरत आहेत. हे सर्व बंडखाेर गिरीश महाजन यांच्या एेकण्यातील आहेत.


सेनेकडूनही खोड्या; संजय राऊत सानपांना भेटले
बंडखाेर भाजप उमेदवाराला शिवसेना नेत्याचा 'आशीर्व
ाद'
नाशिक : विद्यमान आमदार असूनही भाजपने तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादीत जाऊन नाशिक पूर्वमधून निवडणूक लढवणारे बाळासाहेब सानप यांची शुक्रवारी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अचानक त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. सानप यांनी त्यांचे आशीर्वादही घेतले. आधीच या भाजप आमदार सीमा हिरेंपुढील सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंड केलेले असताना आता सानप यांना शिवसेनेकडून 'आशीर्वाद' मिळत असल्याने भाजपमधून नाराजी व्यक्त होत आहे.

भाजपसाेबत ३५ वर्षांपासून एकनिष्ठ अशी अाेळख असलेले आमदार सानप यांची उमेदवारी पक्षाने कापली. अखेरपर्यंत प्रयत्न करूनही पक्ष प्रतिसाद देत नसल्याने सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपविराेधातच उमेदवारी दाखल केली. सानप यांचे शिवसेनेशी निकटचे संबंध असल्यामुळे त्यांचेही झुकते माप हाेते. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांची खप्पामर्जी सानप यांना भाेवल्याचे बाेलले जाते. सानप हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी त्यांच्याविराेधात कशी भूमिका घ्यायची, हा सेना स्थानिक नेत्यांसमाेर पेच हाेता. अशातच, संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सानप यांच्या संपर्क कार्यालयाजवळून जाण्याचे निमित्त करून त्यांची भेट घेतली.

सानप माझे मित्र, संघाचेही कार्यकर्ते
बाळासाहेब हे माझे जुने निकटचे मित्र आहेत. ते आज भाजपत नसले तरी संघात अद्यापही आहेत. पंचवटीतून जात असताना त्यांच्या प्रचार रॅलीची गर्दी बघितली. सहज भेट झाली असून मित्रत्वाच्या भावनेतून त्यांना भेटायला आलो. भाजप-सेना युतीचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले हेसुद्धा माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांचे वडील शिवसेनेचे खासदार असल्यापासून त्यांच्याशी संबंध आहे. यातून राजकीय अर्थ कुणी काढू नये. - संजय राऊत, संपर्क नेते, शिवसेना

बातम्या आणखी आहेत...