आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- कल्याणमध्ये शिवसेना नगरसेविका मनिषा तरे यांचे पती साईनाथ तरे विरोधात ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा आरोप कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने सांगितल्यानुसार, पोलिसात तक्रार केल्यास पाच वर्षांची मुलगी आणि पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपी साईनाथ तरेने पीडितेला दिली होती. पीडितेकडून दमदाटी करत कोणतीही तक्रार नसल्याची नोटरी करुन घेण्यापर्यंत आरोपीची मजल गेली होती. आरोपी साईनाथ तरेने तक्रारदार महिलेला सप्टेंबर 2018 मध्ये व्यवसायात भागिदारीसाठी नेतिवली भागातील मेट्रो मॉलला बोलावून घेतले. भेटीनंतर महिलेने भागिदारीस नकार दर्शवल्यामुळे आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला फेसबुकवर अश्लील फोटो पाठवल्याचाही आरोपही महिलेने केला आहे. एकेदिवशी तरेने महिलेला आपल्या ऑडी कारमध्ये बसवून तिचे जबरदस्ती चुंबन घेतले. याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करुन तो व्हायरल करण्याची भीतीही घातली. त्यानंतर कार पत्रीपूल एपीएमसी मार्केटच्या पाठीमागे नेऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दमदाटी करत आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याची नोटरी तरेने लिहून घेतली. पीडितेला आत्महत्या करण्यापर्यंत शारीरिक आणि मानसिक त्रास होईपर्यंत छळ केल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.