आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या 21 स्टार प्रचारकांची यादी जाहीर..उद्धव, आदित्य यांच्यावर मोठी जबाबदारी तर ज्येष्‍ठ नेत्यांची नावे गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची एक टीम तयार केली आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत, सुभाष देसाई आणि विनोद घोसलकर यांच्यासारख्या नेत्याचा समावेश आहे. शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी राज्यात विविध मतदार संघात जाऊन पक्षाची ही प्रचार करणार आहे.

 

ही आहेत शिवसेनेची स्टार प्रचारक..

शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारकार्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असेल. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जलसंसाधन राज्य मंत्री विजय शिवतारे, राज्य मंत्री गुलाबराव पाटील ,शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ता संजय राऊत, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार नीलम गोर्‍हे, माजी आमदार आणि म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, आदेश बांदेकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचा समावेश आहे.

 

अनेक ज्येष्‍ठ नेत्यांची नावे गायब..
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. तसेच राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांचेही नाव यादीत नाही.

बातम्या आणखी आहेत...