आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रुपयात आरोग्य चाचणी, 10 रुपयांत जेवण; वीजही स्वस्त करण्याचे आश्वासन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपला वचननामा शनिवारी प्रसिद्ध केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर तो जाहीर करण्यात आला. यामध्ये एका रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी, 10 रुपयांत पोटभर जेवण आणि स्वस्त घरगुती वीज दरांसह विविध आश्वासने देण्यात आली आहेत. सोबतच, आरे मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध कायम आहे असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणारे शिवसेना आणि भाजप महायुतीचा जाहीरनामा देखील एकत्रित प्रसिद्ध करणार अशी चर्चा होती. परंतु, आरे प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होऊ शकले नाही. त्यामुळेच, शिवसेना आणि भाजपने आपल्या पक्षाचे जाहीरनामे वेग-वेगळे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या जाहीरनाम्यात (वचननामा) विविध आश्वासने देत असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा आरे प्रकल्पाला विरोध कायम राहील असेही स्पष्ट केले आहे.