आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची मागणी अयाेग्य, मुख्यमंत्री भाजपचाच हाेणार : रामदास आठवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : शिवसेनेला आमच्याशिवाय पर्याय नाही व आम्हालाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेची मागणी अयाेग्य आहे. काहीही झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हाेणार, अशी स्पष्टाेक्ती रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या दाैऱ्यावर आले असता आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या १० तारखेला पंतप्रधानांसाेबत बैठक हाेणार असून शेतकऱ्यांसाठी राज्याप्रमाणेच केंद्राकडूनही माेठी मदत मिळवून दिली जाईल. मुख्यमंत्री काेण हाेणार, असा प्रश्न विचारताच आपल्या नेहमीच्या शैलीत 'आम्ही सांगू ताेच मुख्यमंत्री हाेणार' अशी काेटी करत फडणवीसच मुख्यमंत्री हाेणार असल्याचे ते म्हणाले. 'आम्ही त्यांना देणार मंत्री १६, उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डाेळा' अशी कविता करत आम्हाला २०-२१ आमदार कमी असले तरी आमदार गाेळा करण्यात गिरीश महाजन एक्स्पर्ट आहेत', अशी पुष्टीही त्यांनी जाेडली.
 

बातम्या आणखी आहेत...