आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली नांदेड - मुंबई नवी गाडी राज्यराणी एक्स्प्रेस शुक्रवारपासून सुरू झाली. परंतु या गाडीच्या श्रेयवादावरून भाजप-शिवसेनेत जुंपली आहे.
केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे नांदेड - मुंबई थेट गाडी सुरू करावी अशी मागणी केली. पीयूष गोयल यांनी या मागणीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मनमाड - मुंबईदरम्यान धावणारी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय खासदार चिखलीकर यांना कळवला. त्यानंतर चिखलीकरांनी आपल्या पाठपुराव्यामुळे नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस सुरू होत असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. त्यानंतर ही गाडी शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे नांदेड - तिरुपती, नांदेड - शिर्डी या गाड्याही सुरू होणार असल्याचे चिखलीकरांनी जाहीर केले. त्यानुसार राज्यराणी एक्स्प्रेस शुक्रवारपासून सुरू झाली. परंतु ही गाडी सुरू होण्याच्या दिवशीच शिवसेनेने या गाडीचे श्रेय हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचेही आहे. त्यांनीही या गाडीसाठी रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा केला. परंतु रेल्वे प्रशासनाने मात्र केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे शिवसेनेला डावलण्यासाठी उद्घाटनासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील व शिवसेनेचे स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर यांना डावलले असल्याचा आरोप केला.
शिवसेनेची निदर्शने
आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाला निवेदनही देण्यात आले. राज्यातील सत्तांतरानंतर भाजप - शिवसेनेत राज्यात अनेक ठिकाणी खटके उडाले. राज्यराणी एक्स्प्रेसच्या निमित्ताने ते लोण आता नांदेडमध्येही पोहोचले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.