आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shiv Sena Excludes Sanjay Raut From List Of Leaders Authorized To Speak To Media

शिवसेनेने पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांच्या यादीतून संजय राऊतांना वगळले, त्यांच्या जागी या 18 नेत्यांकडे जबाबदारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या प्रवक्त्यांच्या यादीतून शिवसेनेने सामनाचे संपादक संजय राऊत यांना वगळले आहे. पक्षाच्या मेडीया डिपार्टमेटने 18 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत असलेल्या नेत्यांनाच पक्षाची भूमिका मांडणे आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील. पक्षाच्या मेडीया विभागाचे प्रमुख हर्षल प्रधान यांनी मीडियाला विनंती केली आहे की, त्यांनी या यादीत असलेल्या अधिकृत उमेदवारांकडूनच प्रतिक्रिया घ्याव्यात.
या यादीत असलेल्या नेत्यांमध्ये अरविंद सावंत, नीलम गोर्हे, विशाषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 
याआधी राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी भाजपवर अनेकवेळा टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेतली असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला सोबत घेऊन लढत आहे. या युतीत बिघाडी येऊ नये यासाठी असे केले असावे. 

बातम्या आणखी आहेत...