शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांचे मुंबईत निधन; पहाटे घेतला अखेरचा श्वास

दिव्य मराठी वेब टीम

Mar 28,2019 12:57:00 PM IST

जळगाव- पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार तसेच निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. तात्या पाटील यांचे मुंबईत आजाराने निधन झाले. आर.ओ. तात्या यांनी गुरुवारी पहाटे साडे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 5 वाजता पाचोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

X
COMMENT