आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजित पवार यांनी शनिवारी बंड करत भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. अजित पवारांनी बंड करत शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फिरवल्यानंतर शिवसेनेने आपले 55 आमदार नवी मुंबईतील ललित हॉटेलमध्ये हलवले. तर काँग्रसने आपल्या आमदारांची भोपाळला रवानगी केली आहे. तसेच राज्यपालांनी कोणालाही माहिती न देता फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी करवून घेतल्याने शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपने केलेली सत्ता स्थापना बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.  राज्यपालांच्या निर्णयाविरोधात लढा उभारू असे शिवसेनेचे म्हणणे असल्याचे सुत्रांकडून समजते.  

बातम्या आणखी आहेत...