आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंह उर्फ शेराने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. गुरमीत सिंह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत सामील झाला. शेरा अनेक वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड आहे.
 

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शेराने शिवसेना पार्टी जॉईन केली. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये 21 ऑक्टोबरला मतदान होईल तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.