Politics / छगन भुजबळ यांच्या संदर्भात शिवसेनेत कुठलाही निर्णय झाला नाही, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या निव्वळ अफवा -संजय राऊत

Sep 04,2019 03:23:08 PM IST

नाशिक - छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चा निव्वळ माध्यमांनी उचलेल्या अफवा असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भुजबळ यांच्या पक्ष प्रवेशाचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. उल्लेखनीय बाब म्हणजे, भुजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला शिवसैनिकांकडून विरोध असल्याचे सांगितले जात आहे. येवला विधानसभा मतदारसंघांमधून देखील भुजबळांना जोरदार विरोध करण्यात आला. संजय राऊत यांच्याकडे स्थानिक उमेदवारांनी भुजबळ नको अशी भूमिका घेतली. यात गुरुवारपासून येवला विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे इच्छूक उमेदवार ठीक-ठिकाणी फिरून भुजबळांचा शिवसेना प्रवेश कशी अफवा आहे यावर जागृती देखील करणार आहे असे येथील शिवसैनिकांनी सांगितले.


देशात आर्थिक संकटासाठी भाजप जबाबदार!
यासोबतच देशात आर्थिक संकट असल्याचे संजय राऊत यांनी मान्य केले. त्यात युती म्हणून या अपयशात आपण जबाबदारी घेणार का? असे विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. देशाच्या आर्थिक धोरणांशी निगडीत निर्णय घेण्यासाठी पाच प्रमुख मंत्री आहेत. वेगळी खाते आहेत. त्यात आमच्याकडे केवळ एकच मंत्रिपद असून आर्थिक धोरणांशी आमचा संबंध नाही. एकूण परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याकडे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराष्ट्रातील आर्थिक धोरण देखील मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ठरवत असतात. ती खाती भाजपकडेच आहेत हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

X