आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रवाशांची लुटमार केल्यास खळ्ळ-खट्याक', शिवसेना नेते नितीन नांदगावकरांकडून मुंबईतील रिक्षाचालकांना इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी नांदगावकर मनसेतून शिवसेनेत दाखल झाले

मुंबई- आपल्या खळ-खट्याक भूमिकेसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले आणि नुकतंच विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून शिवसेनेत आलेले नितीन नांदगावकर यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील रिक्षा चालक इलेक्ट्रीकल सर्कीट लावून मीटरचे पैसे वाढवत असल्याचा प्रकार समोर आणला होता. त्यावेळी त्यांनी सर्व रिक्षा चालकांना अशे प्रकार थांबवण्याचा इशाराही दिला होता. तसाच प्रकार पुन्हा समोर आला. यावेळी मुलुंडमधील चेक नाक्यावरील एका रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवणार व्हिडीओही नितीन नांदगावकरांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.



मुलुंड नाक्याजवळ एका रिक्षात इलेक्ट्रीकल सर्किट लावून मीटरचे पैसे वाढवण्याचा गोरख धंदा सुरू होता. नितीन नांदगावकरांना हे कळालं आणि त्या रिक्षा चालकाचा पर्दाफाश केला. व्हिडीओमध्ये मीटर वाढवण्यासाठी रिक्षाचालक करीत कशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे उघड केले. तसेच यावेळी त्यांनी रिक्षाची तोडफोडही केली. यावेळी त्यांनी प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा दररोज फोडणार असा इशाराही दिला आहे.






या व्हिडीओसह त्यांनी एक फेसबुक पोस्टही लिहली आहे. त्यात त्यांनी लिहीले, "रिक्षा ....रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील प्रवासातील एक अविभाज्य भाग एक विश्वासाचे नाते पण त्यात आली बेईमानी ती सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी बनवली गेली आणि बघता बघता मुलुंड मधील चेकनाक्यावर सर्रास सर्वच रिक्षा मध्ये आले घोडा मीटर. सर्व जाती धर्माची लोकं जेंव्हा आपल्याच लोकांना लुबाडायला लागली तर अशा वेळी जनतेने सुद्धा गप्प राहून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन विरोध केला पाहिजे. जवळची भाडी नाकारायचे कारणच ते की लांबच्या भाड्यात घोडा मीटर दाबून हवे तेवढे पैसे उकळायचे बस हाच आमच्या मेहनतीचा धंदा जो बघता बघता सगळ्या मुंबईत फोफावला ....रिक्षा -टॅक्सी सगळेच तरबेज झाले आणि जो तो जनतेला लुबाडायला लागले . कारण जनतेला कधी पडलीच नाही जो तो आपल्या कामात व्यस्त. बस याचाच फायदा ह्या समाजकंटकांनी घेतला आणि मग सगळीकडे दिवसा दिवसाढवळ्या घोडा बटनचा वापर होऊ लागला .... त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बटन लपवण्यासाठी केल्या गेल्या. पण हल्लीचे तरबेज रिक्षा वाले बटन वायपरच्या साठी असणारे बटन, लाईटसाठी असणारे बटन, अशा ठिकाणी #GST बटन लावू लागले... माणसे बघून पुड्या बांधायचा धंदा नावारूपाला आला आणि त्यात कधी पकडले गेले की हाता-पाया पडून गरीब चेहरा बनवून तर कधी दादागिरी करून वेळ मारून नेली पण बेईमानीचा धंदा बंद नाही केला हेच सत्य मुंबईत सगळीकडे दिसून येतंय .... आता आपण विचार करू की ह्यावर उपाय काय ? भरपूर आहेत आणि त्यासाठी कायदे आणि यंत्रणा सक्षम कराव्या लागतील पण तरीसुध्दा जेंव्हा प्रवृत्ती विकृती धारण करते तेंव्हा तो कॅन्सर होतो समाजासाठी आणि कॅन्सर ठीक करायचा असतो तेंव्हा त्यावरील उपाय देखील तेवढेच जालीम असतात तरच कॅन्सर मधून बाहेर पडता येते .....
सावधान मुंबईकर ....."

बातम्या आणखी आहेत...