आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांना कपडे, कागदपत्रांसह 'मातोश्री'वर बोलावले, 5 दिवस करणार मुक्काम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असताना शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांना मातोश्रीवर बोलावले आहे. या आमदारांना 5 दिवस मुक्काम करायचा आहे. त्यासाठी मातोश्रीवर येताना आप-आपले कपडे आणि सर्वच कागदपत्रे घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार, सर्वच सेना आमदार 22 नोव्हेंबर रोजी मातोश्रीला जाणार आहेत. सत्तार यांनी सांगितल्याप्रमाणे, हे आमदार किमान 2 ते 3 दिवस एकाच ठिकाणी राहतील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सोबतच, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सत्तार यांनी केला आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राउत यांनी येत्या 2 ते 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरमध्ये स्थापित होईल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सोनिया गांधींच्या भेटीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे माध्यमांमध्ये वृत्त आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच समोर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार, 288 पैकी 105 जागा भाजप, 56 जागा शिवसेना, 54 जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि 44 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...