आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याने घटक पक्ष अस्वस्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडीत समन्वयक नेमा : लोकजपचे नेते चिराग पासवान

मुंबई- मुंख्यमंत्री पदामुळे फुट पडलेल्या भाजप-शिवसेनेच्या संसाराचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, "शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वादंग उठले आणि याचाच फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेऊन सेनेला आपल्या जवळ आणले. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर अखेर आज दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत शिवसेना न आल्याने भाजपने अधिकृतरित्या शिवसेना एनडीएतून बाहेर गेल्याचे जाहीर केले.

एनडीएमध्ये फूट योग्य नाही
एनडीएमध्ये फूट पडणे योग्य नाही. याबाबत अमित शहा यांनी महाराष्ट्रात सर्व काही व्यवस्थित होणार असल्याचे सांगितले आहे. - रामदास आठवले, रिपाइं नेतेशिवसेनेला “वेगळे काढणे’ ही भाजपची मनमानी आहे. हा निर्णय घेताना एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा का केली नाही?
- संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते