आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीत दिरंगाई करणाऱ्यांना वठणीवर आणा! औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लासूर येथे पीकविमा तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या दरम्यान, शेतकरी कर्जमाफीत दिरंगाई करणाऱ्यांना वठणीवर आणा असे उद्धव यांनी ठणकावले आहे. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असा सवाल केला. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र तर मिळाले परंतु, अद्याप त्यांना कर्जमाफी मिळाली नाही असा आरोप ठाकरेंनी केला आहे. गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे जाऊ असेही ते पुढे म्हणाले आहेत.


कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी औरंगाबाद आणि नाशिक दौऱ्यावर निघाले. याच दरम्यान शिवसेनेच्या वतीने लासूर येथे पीक विमा तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव यांनी आपल्याच सहकारी आणि सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढले. लोक आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत असतानाही सरकावर टीका का करता? सत्तेत असताना विरोधीपक्षाची भूमिका का बजावता? त्यांना एवढेच म्हणणे आहे की शिवसेना सत्ताधारी किंवा विरोधीपक्षासोबत नसून केवळ सामान्यांसोबत आहे. सामान्यांचा आवाज म्हणून आपण सत्तेत आहोत असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...