आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राम मंदिर बांधण्याचे वचन पूर्ण केले नाही तर जनता आम्हाला बुटाने मारेल'- संजय राऊत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंबई- शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी गुरुवारी एक विधान केले आहे. ते म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे वचन आम्ही पूर्ण केले नाही, तर जनला आम्हाला बुटाने मारेल. ते पुढे म्हणाले की, 2014 मध्ये आम्ही राम मंदिर बांधण्याचे वचन दिले होते, पण आम्ही त्याला पूर्ण करू शकलो नाहीत. यावेळेस लोकसभेची निवडणूक राम मंदिराच्या मुद्यावरूनच लढली. 


संजय राऊत म्हणाले, "निवडणुकीच्या आधी आम्ही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत आयोध्येत गेलो होतोत. आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. मला असे वाटते की, यावेळेस राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल, कारण असे झाले नाही तर जनतेचा आमच्यावरील विश्वास तुटेल आणि ती आम्हाला बुटाने मारेल. 


'राम मंदिरचे बांधकाम लवकरच सुरू होईल'
पुढे ते म्हणाले की, राम मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होईल. एनडीएने यावेळेस 350 जागा जिंकल्या आहेत. भाजपजवळ 303 खासदार आहेत, तर शिवसेनेकडे 18 आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी यापेक्षा आणकी काय हवय?


लोकसभेच्या निकालानंतर सर संखचालक मोहन भागवत यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रम म्हटले होते की, राम मंदिराचे काम करायचे आहे आणि रामाचे काम होणारच. भाजपनेही आपल्या घोषणापत्रात राम मंदिराचा उल्लेख केला होता. भाजपने सांगितले की,ते संविधानाच्या चौकटीत राहून राम मंदिर बांधेल. 


मुस्लिमांसाठी भेट नाहीये कश्मीर- शिवसेना
कलम 370 वर बोलताना शिवसेनेने स्पष्ट केले की, मुस्लिमांना कश्मीर भेट स्वरूपात देणार नाहीत. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामध्ये लिहीले की, घाटीमध्ये मुस्लिमांची संख्या 68.35% आहे, तर हिंदू फक्त 28.45% आहेत. याचा अर्थ हा नाहीये की, कश्मीर मुस्लिमांना भेट म्हणून दिले जाईल. तेदेखील भारतीय आहेत आणि देशातील कायदा त्यांच्यासाठीही आहे. यासाठी कलम 370 ला रद्द करावे लागेल.


भारतीय संविधानमध्ये अनुच्छेद 370 च्या माध्यमातून जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार दिले गेले आहेत, ज्याअंतर्गत तीन गोष्टी (रक्षा, परराष्ट्र आणि दूरसंचार) ला सोडून भारत सरकार त्या राज्यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाही. त्याशिवाय राज्य सरकारला नवीन कायदे बनवण्याचीही परवानगी आहे.