आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांकडून फंड मिळवण्यासाठी शिवसेनेकडून स्टंटबाजी : राजू शेट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असताना त्यांची चौकशी करण्याऐवजी मोर्चा काढण्याचा देखावा करणाऱ्या शिवसेनेची कंपन्यांकडून फंड मिळवण्यासाठी स्टंटबाजी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. 


विमा कंपन्यांच्या नफ्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करत उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याची तक्रार इर्डाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात ९९ लाख शेतकऱ्यांनी २८८ कोटींचा प्रीमियम भरला# त्यात सरकारचे अनुदान मिळून १२३७ कोटींचा नफा विमा कंपनीस यंदा होतो व शेतकऱ्यांचे क्लेम नाकारले जातात, यात सरकारी अधिकारी व विमा कंपन्यांची हातमिळवणी आहे. गेल्या ५ वर्षांत राज्यातील विमा कंपन्यांना मिळालेली रक्कम ५ हजार कोटींच्या वर जाते. मात्र, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हा मूळ उद्देश मात्र त्यातून साध्य होत नाही, असेही शेट्टी म्हणाले.

 

उंबरठा उत्पन्नाबाबत गोंधळ
पिकांची नुकसान भरपाई ठरवण्यासाठी शासनाने विमा कंपनी व  सरकारी अधिकारी यांची समिती नेमली. समितीला नुकसानीचे प्रमाण ठरवण्याचे अधिकार देण्यात आले. मात्र, विमा कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीपेक्षा भरपाई टाळण्यासाठी जास्तीचे उंबरठा उत्पन्न ठेवल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.