आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी नगरसेवकावर शिवसेना समर्थकांचा प्राणघातक हल्ला; गाडीची केली तोडफोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यावर शिवसेना समर्थक ३० जणांनी हल्ला करून त्यांच्या गाडीची ताेडफाेड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पाेलिस ठाण्यात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखाेरांनी आसवानी यांना पिस्तूलचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली आहे. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अण्णा बनसाेडे, तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार गाैतम चाबुकस्वार निवडणुकीच्या रिंगणात होते. साेमवारी सकाळी १५ जण पिंपरी कॅम्पमध्ये आसवानी यांच्या कार्यालयाजवळ संशयास्पदरीत्या फिरत हाेते. याबाबत आसवानी यांनी पाेलिसांना फाेन करून माहिती दिली. मात्र, आसवानी हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना अचानक चार ते पाच कारमध्ये ३० हल्लेखाेर त्या ठिकाणी आले. कार्यालयाजवळ येताच त्यांनी आसवानी यांच्या समर्थकांना मारहाण करत डब्बू आसवानींवर प्राणघातक हल्ला केला. तसेच त्यांचा मुलगा व भावालाही मारहाण केली. दीपक टाक, जितू मतानी, माेहित पुलानी, अरुण ठाक, अनिल पारचा, लछू पुलानी व त्यांच्या साथीदारांनी सदर हल्ला घडवाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अभिनवकुमार सिंग जखमी झाले.

पुणेवाडी केंद्रावर सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची

किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता पारनेर तालुक्यात शांततेत मतदान झाले. सकाळी पाऊस पूर्णपणे थांबल्याने मतदारांनी उत्साहात मतदान केले. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यावर मतदानाचा वेग मंदावला. दुपारी एकपर्यंत ३८ टक्के, तीनपर्यंत ४८ टक्के, तर संध्याकाळी पाचपर्यंत ५८ टक्के मतदान झाले. तीन मतदान केंद्रांवर यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले. टाकळी ढोकेश्वर येथील मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजता यंत्र बंद पडले. मुंगशी व इसळक केंद्रावर सकाळी १० च्या सुमारास मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तिन्ही ठिकाणी तब्बल दोन तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती. प्रशासनाने दुसरी यंत्रे उपलब्ध करून दिली. राळेगणसिद्धी येथील दोन्ही मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथानपणामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पुणेवाडी येथील केंद्रावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला.