Home | Maharashtra | Mumbai | shiv sena workers shows strong oppose to BJP Firebrand Leader kirit somaiya In Mumbai

युती झाली नसतानाही शिवसैनिकांचा भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 09, 2019, 07:10 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळातही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली होती.

  • shiv sena workers shows strong oppose to BJP Firebrand Leader kirit somaiya In Mumbai

    मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युतीची बोलणी सुरू असून अजून युतीची घोषणा झालेली नसतानाच शिवसैनिकांनी मात्र युती होणारच, असे गृहीत धरून भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांच्या नावाला विरोध दर्शवत प्रचार करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवले आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे.

    शनिवारी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीत या मतदारसंघात शिवसेनेचे असलेले काम, संभावित उमेदवार, शिवसेनेची ताकद आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती बैठकीस उपस्थित सूत्रांनी दिली. या वेळी मातोश्रीबाहेर ईशान्य मुंबईतील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी भाजपशी युती झाल्यास किरीट सोमय्या युतीचे उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करणार नाही, असा शिवसैनिकांचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.

    गेले काही महिने सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जाग यावी आणि त्यांनी जमिनीवर यावे, अशी टीका त्यांनी गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर केली होती. शिवसेनेने गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले असतानाही भाजपची मते खाण्यासाठी उमेदवार उभे केले होते. त्यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळातही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली होती. पालिकेच्या विकासकामांतील टक्केवारी मातोश्रीवर पोहोचत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Trending