आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांनी दिला होता 'हटाव लुंगी - बजाव पुंगी'चा नारा; आता नातू लुंगी नेसून लोकांकडे मागतोय मते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीयांचा विरोध करत शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी 'हटाव लुंगी बजाव पुंगी'चा नारा दिला होता. मात्र त्यांचा नातू आदित्य ठाकरे लुंगी परिधान करून लोकांना मते मागताना दिसत आहे. आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळीतून विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दक्षिण भारतीय, प्रामुख्याने कर्नाटकातून आलेले मतदार राहतात. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी आदित्य 'लुंगी' परिधान करून प्रचार करत आहेत. सोमवारी ते वरळीच्या गोपाळनगरमद्ये लुंगी परिधान केलेले दिसून आले. 

सोशल मीडियावर होत आहे चर्चा
आदित्य ठाकरेंचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरे एक मुक्त विचारी नेता असल्याचे लोक म्हणत आहेत. तसेच त्यांच्या पेहरावाचे कौतुक होत आहे. शिवसेना आपला राजकीय अजेंडा बदलण्याची तयारीये का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

बाळासाहेबांनी दक्षिण भारतीयांविरोधात सुरु केले होते हे आंदोलन
1960 आणि 70 च्या दशकात दक्षिण भारतीय लोक मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येऊन वसले होते. या लोकांमुळे मराठी माणसाचा हक्क हिरावून जात असल्याचे बाळासाहेबांना वाटले आणि त्यांनी यांच्याविरोधात एक मोठे आंदोलन सुरु केले. आपल्या 'मार्मिक' या मासिकाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी दक्षिण भारतातून येऊन मुंबईत काम करणाऱ्यांविरोधात मोर्चा सुरु केला. यानंतर तमिळ रेस्तराँ आण चित्रपटांना विरोध केला. या आंदोलनामुळे बाळासाहेब काही दिवसांतच मोठे मराठी नेता बनले. दक्षिण भारतीयांच्या विरोधाच्या आधारेच त्यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी 'बजाओ पुंगी-हटाओ लुंग'चा नारा दिला. या नाऱ्यामुळे बाळासाहेब देशभरात ओळखले जाऊ लागले. यानंतर शिवसेनेने हळूहळू कामगार संघटनेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि शिवसेना पक्ष मुंबईचा आवाज बनला.

बातम्या आणखी आहेत...