आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 28 लाख नवमतदार; युवासेना करणार फाॅलाे अन‌् मिळवणार लाइक्स 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या महाराष्ट्रात २८ लाखांपेक्षा जास्त नवमतदार असतील. तरुण मतदारांचीही संख्या कोटींत आहे. तरुणाईचा सोशल मीडियाबद्दल ओढा सर्वांनाच माहीत आहे. या तरुणाईची हीच व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेच्या युवा सेना सोशल मीडियावर मोठे कॅम्पेन राबवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ओढलेले आसूड जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याबरोबरच प्रत्यक्ष फील्डवरही शिवसैनिकांच्या मदतीने युवासेना काम करणार असल्याची माहिती युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा केंद्र सरकारवर टीका करतात, मुखपत्रात अग्रलेख लिहितात तेव्हा त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम युवा सेना करत आहे. 

 

या मुद्द्यांवर आहे भर 
भाजप सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, महागाई आदी मुद्दे तरुणांसमोर मांडले जात आहेत. शेतकऱ्यांच्या तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी शेतमालाला भाव नसणे, फसलेली कर्जमाफी, भारनियमन, पाणीटंचाई, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी विषयही हाताळले जात आहेत.
 
असे काम करत आहेत युवासैनिक 
युवासेनेच्या सोशल मीडियाचे मुख्य केंद्र सेना भवन येथे आहे. तेथे तरुणांचीच एक टीम कार्यरत आहे. आदित्य ठाकरे वेळोवेळी जे प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित करतात ते ट्विटही राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम युवासेनेचे कार्यकर्ते करत आहेत. 

 

प्रत्येक जिल्ह्यात एक टीम 
फक्त शहरापुरती मर्यादित असलेली युवासेना आता गाव पातळीवर कार्यरत असून प्रत्येक जिल्ह्यात एक युवा टीम कार्यरत आहे. आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीच युवासेनेच्या माध्यमातून लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

 

सोशल मीडियाच नव्हे, तर मैदानातही उतरले कार्यकर्ते 
केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरूनही युवासेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. ते शिवसैनिकांसोबत थेट मतदारांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या कार्यांची माहिती देण्याचे काम करत आहेत. 

 

जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठीही युवासेनेेचे कार्यकर्ते काम करत आहेत. वेळोवेळी युवासेना पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून स्वतः आदित्य ठाकरे योजना आखत आहेत. 

 

सोशल फॉलोअर्स 
आदित्य 

1.36 लाख 
18 लाख 
91 हजार 

 

शिवसेना 
5.36 लाख 
1.49 लाख 
39.4 हजार 

 

पाहणीसाठी युवा निरीक्षक 
प्रत्येक टीमला एक युवासेना निरीक्षक देण्यात आला असून तो कामावर लक्ष ठेऊन आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर अगोदरपासूनच शिवसेनेप्रती तरुण-तरुणींचे मत वळवण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांतून युवासेना करत आहे

वोटों से छू लो तुम... 
देशातील तरुणाई 

2 कोटी तरुण दरवर्षी 18 वर्षांचे होतात 2011 च्या जनगणनेनुसार. 
10 कोटी नवमतदार असतील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत. 
2.6 कोटी तरुणांनी (18 ते 20 वयोगटातील) आधीच मतदार यादीत नावनोंदणी केली आहे. 
1.38 कोटी तरुणांनी (18 ते 19 वयोगटातील) नावनोंदणी केली आहे. 

 

महाराष्ट्रातील युवा 
28.53 लाख नवमतदारांनी महाराष्ट्रात केली आहे नावनोंदणी. 
17.53 लाख पुरुष नवमतदार यंदा महाराष्ट्रात करणार मतदान 
18.34 लाख महिला नवमतदार यंदा राज्यात करतील मतदान. पुणे, मुंबई, ठाण्यात नवीन मतदारांची संख्या जास्तच. 

बातम्या आणखी आहेत...