आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा वाटपावरून नाराज शिवसेनेच्या 26 नगरसेवकांसह 300 कार्यकर्त्यांचे राजीनामे; बंडखोर धनंजय बोडारे यांना देणार समर्थन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील 26 नगरसेवकांसह 300 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांना पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या आदेशामुळे हे सर्व नाराज आहेत. नाराज झालेल्या शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांच्याकडे आपले राजीनामे पाठवले आहे. यासोबतच शिवसैनिकांनी शिवसेनेचे पुरस्कृत बंडखोर धनंजय बोडारे यांना समर्थन देणार आहेत. 
 

भाजपला जागा सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी
विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांना पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या आदेशामुळे हे सर्व नाराज आहेत. सुत्रांनुसार स्थानिक नेत्यांना सदरील जागेवर शिवसेनेचा उमेदवार असावा अशी इच्छा होती. मात्र जागावाटपावेळी ही जागा भाजपकडे गेली. यानंतर स्थानिक नेत्यांनी बोडारे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी एक बैठक बोलावली होती. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला समर्थन द्यावे असे सांगण्यात आले होते. या राजीनाम्यानंतर शिवसेनेची काय भूमिका असेल हे पाहणे औचित्याचे ठरले आहे.