Home | Maharashtra | Mumbai | Shiv Sena's deputy leader Haji Arafat leave sena, taken entry in BJP

शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत यांची सेनेला सोडचिठ्ठी, भाजपत प्रवेश

विशेष प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 07:52 AM IST

शिवसेनेचे उपनेते व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख (मुंबई) यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश

  • Shiv Sena's deputy leader Haji Arafat leave sena, taken entry in BJP

    मुंबई- शिवसेनेचे उपनेते व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख (मुंबई) यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा मोबदला भाजपने त्यांना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद बहाल केले आहे. शेख यांची सोडचिठ्ठी शिवसेनेला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.


    शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक ४ वर्षे प्रलंबित ठेवलेल्या मंडळे, विकास महामंडळे आणि प्राधिकरणांच्या तब्बल २१ नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात शिवसेनेत नाराज असलेले हाजी अराफत शेख यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. शेख यांना शिवसेनेच्या कोट्यातून अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आल्याचा समज होता. मात्र शनिवारी रात्री शेख यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या निवडीबद्दल त्यांचे अाभार मानले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रम शेख भाजपत प्रवेश करणार आहेत. शेख यांना विधान परिषद हवी होती. मात्र सेनेने ती न दिल्याने ते नाराज होते. अराफत शेख हे महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे शेख यांचा 'जय महाराष्ट्र' शिवसेनेला चांगलाच फटका बसवणारा असेल.


    साबीर शेख यांचे पुतणे, काही काळ मनसेतही
    अराफत शेख हे शिवसेनेचे दिवंगत नेते साबीर शेख यांचे पुतणे आहेत. सेनेतून २००६ मध्ये ते मनसेत गेले होते. २०१४ मध्ये परत ते शिवसेनेत आले. मागच्या वर्षी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात टीका केली होती. त्यानंतर ते शिवसेनेत नाराज असल्याचे समोर आले.

Trending