Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Shiv Sena's District Contact Head Tanaji Sawant guide to workers

शिवसेनेच्या चौकटीत राहून काम करा : तानाजी सावंत

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 08:45 AM IST

अस्मिताताई यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचे म्हटले जाते, पण पक्ष कोणावर अन्याय करत नसतो. आपणच पक्षाच्या चौकटीत राहून

  • Shiv Sena's District Contact Head Tanaji Sawant guide to workers

    सोलापूर- अस्मिताताई यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचे म्हटले जाते, पण पक्ष कोणावर अन्याय करत नसतो. आपणच पक्षाच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. पदे येतील आणि जातीलही, आपले शिवसैनिक हे पद कायम असते. परंतु, आपण आली वृत्ती सुधारली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनी कानपिचक्या दिल्या. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवस्मारक सभागृह येथे आयोजित केलेल्या महिला उद्योजकता मेळाव्याचे.


    या वेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे, नगरसेवक अमोल शिंदे, दीपक गायकवाड, महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड यांची उपस्थिती होती. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


    पद मिळाले नाही म्हणून पक्षाशी गद्दारी नकोच
    आपण किती काम केले, याचा सर्व लेखाजोखा पक्षाकडे असतो. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला तरी पक्षाशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. पक्ष योग्य वेळी योग्य पद्धतीने आपला विचार करतो. आपल्या पराभवास कुणी दुसरा कारणीभूत नसतो तर त्यासाठी आपणच जबाबदार असताे. आपल्यात काही मतभेद असतील तर ते बंद खोलीत मिटवता आले पाहिजेत. एखादे पद मिळाले नाही म्हणून पक्षाशी गद्दारी करता कामा नये. जरी पक्षांनी आपल्यावर अन्याय केला असल्याची भावना असेल तरी आपण पक्षशिस्त मोडता कामा नये. आपल्यातील मतभेदांना गाढून आपली वृत्ती सुधारा, असा सल्लाही प्रा. सावंत यांनी दिला.

Trending