आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' महाव्यवस्थापकांसाठी माजी मंत्र्यांचा आटापिटा! शिवसेनेचे दिवाकर रावते यांची सौम्य शिक्षेची सभागृहात मागणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नागपूर : वाहन निरीक्षक भरतीत अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (अपील) आर.आर. पाटील (मुंबई) यांना आर.आर. पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. त्यांना वाचवण्यासाठी चक्क माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी विधान परिषदेत मोठा आटापिटा केला. मात्र, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बडतर्फी मागे घेण्यास नकार दिल्याने रावते यांची मोठीच पंचाईत झाली.

मंत्री सुभाष देसाईंच्या निवेदनावेळी रावतेंनी पाटील हे सेना दलातील माजी अधिकारी असून त्यांनी देशासाठी लढले आहेत. तसेच ते ३१ डिसेंबर रोजी निवृत्त हाेत आहेत. याची दखल घेऊन बडतर्फ न करता त्यांना सौम्य शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. त्यावर काँग्रेसच्या भाई जगतापांनी आक्षेप घेत पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.

शेवटी सभापतींनी पाटील दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन या प्रकरणावर पडदा पाडला. अधिकाऱ्यास वाचवण्याचा माजी परिवहनमंत्र्याचा आटापिटा पाहून सभागृह चकित झाले हाेते.

७० वर्षांत प्रथमच निलंबन


१. माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या काळात आर. आर. पाटील हे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक होते.
२. आर. आर.पाटील हे सध्या अपील विभागाचे महाव्यवस्थापक आहेत.
३. रावते मंत्री असतानाना शिवशाही एसटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पाटील यांच्यावर होती.
४. एसटी महामंडळाच्या ७० वर्षांच्या कारकीर्दीत महाव्यवस्थापकाच्या समान अधिकाऱ्यावर एकदाही निलंबनाची कारवाई झालेली नाही.
 

बातम्या आणखी आहेत...