आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा दृष्टिकोन 360 अंशांचा, भाजपचे मात्र कलम 370

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत थाळी, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती, एक रुपयात आरोग्य चाचणी यांसारख्या घोषणा करत आपला सर्वसमावेशक दृष्टिकोन स्पष्ट केला. शिवसेनेने आतापर्यंतच्या भाषणांतून केलेल्या घोषणा...

प्रचार रंगत येत असताना भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचार मैदानात उतरवले आहे. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री फडणवीस सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेताहेत. त्यांच्या सभांत हे सर्व नेते कलम ३७० व इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर भर देताना दिसताहेत.

शेतकरी : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, शेतकऱ्यांसाठी कुंपण अनुदान, शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी १० हजार रुपये जमा करणार, तालुका स्तरावर पीक विमा कार्यालय, खतांच्या किमती पाच वर्षे स्थिर ठेवणार.

महिला, विद्यार्थी : महिलांसाठी सुरक्षित बससेवा उपलब्ध करून देणार, गरीब, हुशार विद्यार्थ्यांना मोफत महाविद्यालयीन शिक्षण, १५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणणार.

कलम ३७० : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आहे. हाच मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपचा प्रत्येक नेता आपल्या भाषणातून करताना दिसतो आहे.

सर्जिकल स्ट्राइक : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या यशस्वी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेखही भाजप नेते आपल्या भाषणात आवर्जून करत आहेत.

सर्वसामान्यांसाठी : १० रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी देणार, ३०० युनिटपर्यंतच्या वीज बिलात ३०% सवलत देणार.

राष्ट्रीय मुद्दे : अयोध्येत राममंदिर उभे करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणार, घुसखोरांना हाकलून लावणार.

तीन तलाक : केंद्र सरकारने तीन तलाक रद्द केल्याचा मुद्दाही भाजपच्या प्रचारातील आणखी एक मुख्य मुद्दा आहे.

राफेल विमान : दसऱ्या दि‌वशी भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानाचा मुद्दाही भाजपच्या प्रचारात आहे.