आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवने वीणासाठी गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालून विचारले - 'कैसा लगा सरप्राइज रानी साहेबा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकलेले वीणा जगताप- शिव ठाकरे ख-या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहेत. खरं तर या शोमध्ये दोघांमध्ये सूत जुळले होते. पण शो संपल्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये राहणार की शो संपल्यावर त्यांचे रिलेशनशिपही संपुष्टात येणार असा प्रश्न होता. मात्र शिव आणि वीणा यांनी खासगी आयुष्यात आपल्या नात्याची कबुली दिली आहे. ही जोडी आता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.अलीकडेच हे दोघे काश्मिरमध्ये सुटी एन्जॉय करुन परतले.


आता शिवने वीणासाठी एक खास सरप्राइज प्लान केले होते. शिवने वीणासाठी त्याच्या घरी खास सजावट केली होती. त्याने वीणासाठी गुलाबांच्या फुलाच्या पायघड्या घातल्या होत्या. इतकेच नाही तर संपूर्ण घरभर मेणबत्त्या लावल्या होत्या. या रोमँटिक क्षणांचे खास फोटो वीणा आणि शिवने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवने या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन वीणाला  'कैसा लगा सरप्राइज रानी साहेबा' असा प्रश्न विचारला. 

तर शिवचे हे प्रेमळ सरप्राइज बघून वीणा भारावून गेली. हे सरप्राइज बघून ''आई शप्पथ... शब्दच नाहीत.. कामावरुन घरी परतल्यानंतर माझ्या स्वीटहार्टकडून जगातील सर्वोत्कृष्ट सरप्राइज मिळाले. थँक यू सो मच टेडी...'' अशी रिअॅक्शन वीणाने दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...