आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shiva Temple: Offered Broom On Shivling In Pataleeshwar Shiva Temple In Uttar Pradesh

उत्तरप्रदेशातील पाताळेश्वर शिव मंदिरातील शिवलिंगावर फळ-फुलांसह अर्पण करतात झाडू, प्राचीन काळापासून सुरु आहे ही परंपरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क - उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील सदत्बदी गावात अतिप्राचीन पाताळेश्वर शिव मंदिर आहे. हे शिव मंदिर आपल्यातच एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरात लोक भगवान शंकराला झाडू अर्पण करतात. येथे झाडू अर्पण करण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंदिरातील महादेवाच्या पिंडाचा अभिषेक करण्यासाठी कांवडिये हरिद्वार येथून गंगाजल आणण्यात येते. सोमवारी या मंदिरात दुरवरून भक्तगण दर्शनासाठी येतात. 


का अर्पण करतात झाडू 
शिवलिंगावर झाडू अर्पण केल्याने त्वचा रोग ठीक होत असल्याचे मानले जाते. श्रावण महिन्यात भक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी होते. येथे येणाऱ्या भक्तांच्या मते त्वचा रोगाव्यतिरिक्त इतर रोग दूर होतात. तसेच आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. यामुळे या मंदिरात दरवेळी लोकांची दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. हे मंदिर 150 वर्षे जुने असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 


पाताळेश्वर शिव मंदिराशी निगडीत अख्यायिका 
अनेक वर्षांपूर्वी एक धनवान व्यापारी चर्मरोगाने पीडित होता. तो एकदा आपला उपचार करण्यासाठी एका वैद्याकडे जात असताना वाटेत त्याला तहान लागली. तो पाणी पिण्यासाठी जवळ असलेल्या एका आश्रमात गेला. आश्रमातून परतत असताना त्याची तेथील एका झाडूसोबत त्याची टक्कर झाली. त्या झाडूच्या स्पर्शामुळे त्याचा चर्मरोग ठीक झाल्याचे सांगितले जाते. व्यापाऱ्याने आश्रमातील साधूला हीरे-रत्ने देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर येथे मंदिर स्थापन केले तर चांगले होईल असे साधूने त्याला सांगतिले. व्यापाऱ्याने साधूच्या म्हणण्यानुसार आश्रमाजवळ शिवमंदिर उभारले. आज ते शिवमंदिर 'पाताळेश्वर मंदिर' नावाने प्रसिद्ध झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...