आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलावरील क्राॅसबारमुळे चार किमी फेऱ्याने पाेहाेचले अग्निशमन बंब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  -शिवाजीनगर भागातील शिवविजय साॅ-मिल व स्वस्तिक प्लायवूडला शनिवारी रात्री १२.३० वाजता भीषण अाग लागली. यात लाखाे रुपयांचे नुकसान झाले. शिवाजीनगर उड्डाणपुलावर क्राॅसबार असल्याने अग्निशमन बंब घटनास्थळावर पाेहाेचण्यासाठी अडथळा अाला. परिणामी अाग भडकल्याने हानीची तीव्रता वाढली.


शिवाजीनगरच्या लाकूडपेठेत जवाहर पटेल व प्रभुदास पटेल यांची शिवविजय साॅ-मिल अाहे. शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता अचानक अाग लागली. अाजूबाजूला सर्वत्र लाकडांचे ढीग व प्लायवूडचा साठा पडलेला हाेता. त्यामुळे अागीने राैद्ररुप धारण केले. दरम्यान, रात्री ११ वाजता वीजपुरवठा अचानक खंडित झाला हाेता. त्यानंतर वीज सुरळीत झाली. १२ वाजेच्या दरम्यान वखारीतून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिक व वखारीतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात अाले. नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. सात बंबांनी पाण्याचा मारा करूनही अाग अाटाेक्यात अाली नव्हती.


शाॅर्टसर्किटने अाग शक्य
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर क्राॅसबार लावलेला असल्याने अग्निशमन बंब गुजराल पेट्राेलपंपाकडील रस्त्याने घटनास्थळी पाेहाेचले. चार किमी फेऱ्याने हे बंब पाेहाेचत हाेते. त्यामुळे अाग अाटाेक्यात अाणण्यास अडथळे अाले. दरम्यान, अागीचे ठाेस कारण समाेर अालेले नसले तरी शाॅर्टसर्किटने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज अाहे.


दाेन तासांत सात बंब पाण्याचा मारा
वखारीला अाग लागल्याने एक किलाेमीटर अंतरावरून ज्वाळा दिसत हाेत्या. घटनास्थळाला लागून अन्य वखारी असल्याने अाग भडकण्याचा धाेका हाेता. तसेच शेजारीच रहिवाशी भाग असल्याने जीवितहानीची भीती हाेती. अागीवर नियंंत्रण मिळवताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. महापालिकेसह जैन इरिगेशन कंपनीचे अग्निशमन बंबही पाचारण करण्यात अाले. त्यानंतर पहाटे २ वाजता एरंडाेल पालिकेचा अग्निशमन बंबही दाखल झाला हाेता. दाेन तासात सात बंबांनी अाग विझवण्याचा प्रयत्न केला तरीही अाग अाटाेक्यात अाली नव्हती.


पहाटे २.१५ वाजेपर्यंत सुरू हाेते अग्नितांडव, पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी ठाण मांडून
वीजपुरवठा केला खंडित
वखारीला अाग लागल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून या परिसरातून जाणारा वीजपुरवठा खंडित करण्यात अाला हाेता. अंधारामुळे मदतकार्यात काहीसे अडथळे अाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शीघ्र कृती दलाच्या पथकासह पाेलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, उपनिरीक्षक सुभाष पाटील यांच्यासह इतर पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन अाग विझवण्याचा प्रयत्न केला.
शिवाजीनगर परिसरातील लाकूडपेठेतील शिवविजय साॅ- मिलला लागलेल्या अागीने असे राैद्ररूप धारण केले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...