आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : 2020 हे वर्ष शिवानी सुर्वेचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री शिवानी सुर्वेवर 2020च्या सुरूवातीपासून पुरस्कारांची बरसात होत आहे. नुकताच सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा हा शिवानीचा चौथा पुरस्कार आहे.
सूत्रांच्यानूसार, शिवानी सुर्वेच्या करीयरच्या ह्या चढत्या आलेखाने तिला आता सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रीच्या पदी पोहोचवले आहे. 'बिग बॉस' मराठीच्या दूस-या पर्वामूळे जरी तिला लोकप्रियता मिळाली असली तरीही हा आलेख उंचावत नेण्याचे काम तिच्या अभिनय कारकिर्दीने केले आहे आणि 'ट्रिपल सीट'साठी मिळालेल्या ह्या पुरस्काराने हेच सिद्ध केले. सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार स्विकारल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणाली, “ ह्या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते. मी फक्त माझ्या 'ट्रिपल सीट'मधल्या भूमिकेवर मेहनत केली होती. पण माझ्या चाहत्यांनी मला सर्वोत्कृष्ट डेब्युंटंट अभिनेत्री बनवण्यासाठी भरघोस मतदान केले नसते. तर आज हा पुरस्कार मला मिळाला नसता. त्यामूळे मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे.”
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.