Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Shivdas arrested who trying to kill Arun ugle

कार अंगावर घालणारा शिवदास अखेर गजाआड; आरोपी खासदार गांधी यांच्या कार्यकर्त्याचा भाऊ

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:35 AM IST

खासदार दिलीप गांधी यांचा देऊळगाव येथील कार्यकर्ता सचिन गायकवाड यांचा भाऊ शिवदास गायकवाड हा खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे

 • Shivdas arrested who trying to kill Arun ugle

  श्रीगोंदे- खासदार दिलीप गांधी यांचा देऊळगाव येथील कार्यकर्ता सचिन गायकवाड यांचा भाऊ शिवदास गायकवाड हा खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे देत नव्हता. घोगरगाव येथील अरुण उगले यांनी पैसे मागितले असता त्यांच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणातील फरार आरोपी शिवदास गायकवाड यास पोलिसांनी शनिवारी पहाटे ४ वाजता गजाआड केले.


  श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगाव येथील सचिन गायकवाड याने घोगरगाव येथील अरुण मारुतराव उगले (४९) यांच्याकडून चाळीस लाखांना शेतजमीन विकत घेतली. जमीन विकत घेताना गायकवाडने उगले यांना धनादेशाद्वारे तेरा लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगितले. सचिन पैसे देण्यास टाळाटाळ करत असे. ४ ऑगस्ट रोजी सचिनचा भाऊ शिवदास हा घोगरगाव येथे ४ वाजण्याच्या सुमारास होंडा सिटी गाडी (एमएच १६ बी आर ९६६६) मधून आला. ही कार उगले यांना बसस्थानकावर दिसल्यावर गाडीजवळ जाऊन ते शिवदासला म्हणाले, चहा घ्यायला या, गरिबाचा चहा घ्या. त्यावर शिवदास म्हणाला, मला चहा नको, मी उतरत नाही, तुझे काय काम आहे ते सांग. त्यावर माझ्या जमिनीचे पैसे सचिनला द्यायला सांगा, बरेच दिवस झाले पैसे दिलेले नाहीत. पैसे मागितल्याचा शिवदासला राग आला. तो म्हणाला, पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर. चार लोकांत पैसे परत मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. उगले डाव्या बाजूला खाली पडले व गंभीर जखमी झाले. काही वेळातच लोक जमा झाले. ते पाहून शिवदास कारसह पळून गेला.
  याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ५ ऑगस्टला अरुण मारुतराव उगले यांच्या फिर्यादीवरून भांदवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या एका राजकीय पुढाऱ्याचा फोन पोलिसांना येत होता. तथापि, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी अखेर गुन्हा दाखल केला.


  अटक न करण्यासाठी दबाव
  आरोपी शिवदास गायकवाडला पकडून पोलिस ठाण्यात आणताच त्याला अटक करू नये म्हणून पोलिसांना अनेक नेत्यांचे फोन आले, पण निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दबावाला बळी न पडता आरोपीला अटक केली. पत्रकारांशी बोलताना भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव फक्कडराव इथापे म्हणाले, माझ्याकडून सचिन गायकवाडने ४ लाख रुपये वर्षापूर्वी घेतले. पैशांची मागणी केल्यास उडवाउडवीचे उत्तरे देऊन तो, भाऊ शिवदास व वडील दिलीप हे तिघे दमदाटी करून शिवीगाळ करताा. खासदार गांधी व सुवेंद्र गांधी यांच्याकडे तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.

Trending