Home | Maharashtra | Mumbai | shivneri ticket price decreased by 80 to 120 rupees, new rate will start from 8 jully

शिवनेरीच्या तिकीदरात भरगोस कपात; परिवहनमंत्री दिवाकर रावतेंची घोषणा, नवे दर 8 जुलैपासून लागू

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 03, 2019, 03:00 PM IST

"शिवनेरी" ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे

  • shivneri ticket price decreased by 80 to 120 rupees, new rate will start from 8 jully

    मुंबई- मुंबई-पुणे मार्गावर धावणारी एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंतची भरगोस कपात करण्यात आली आहे. याबाब परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली घोषणा केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे 8 जुलैपासून लागू होणार आहेत.

    गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची "शिवनेरी" ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 7 मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात 435 फेऱ्या केल्या जातात. याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे रावतेंनी स्पष्ट केले.

    मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशांचा ओढा आता शिवनेरीकडे वळेल. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार पासून कमी झालेले नविन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Trending