आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराला लाडू भरवत होती महिला, हे पाहून पतीने केली युवकाची हत्या, समोर पडलेल्या मृतदेहाला पाहून पत्नीने जे उद्गार काढले, ते ऐकून खुश झाला पती...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपूरी/ग्वालियर(मध्यप्रदेश)- 10 दिवसांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. सुरूवातील कुटुंबीय मृत्यूमागे विजेच्या ट्रांसफार्मरमधून घेतलेले कनेक्शन असल्याचे सांगत होते. पण नंतर हत्येमागे प्रेम प्रकरण असल्याचे समोर आले आहे. ज्या महिलेसोबत मृत युवकाचे प्रेम संबंध होते, त्याची माहिती महिलेच्या पतीला लागली होती. त्यामुळे महिलेने लाडुमधून युवकाला विष दिले. महिला मृत युकक अशोकला लाडू भरवत होती, त्यावेळी अचानक महिलेचा पती आला आणि त्याने अशोकच्या डोक्यात वार केले. अचानक झालेल्या या वारामुळे अशोक जागीच कोसळला आणि त्याचा जीव गेला. त्यानंतर पत्नी म्हणाली- 'तुम्ही हे काय केले, मी तर याला विष घातलेले लाडू भरवत होते. मला तर याचा मारायचेच होते. हे ऐकून पती खुप खुश झाला. पोलिसांनी आरोपी पती पत्नीवर हत्येचा गु्न्हा नोंदवला आहे.


मारण्यासाठी लाडुत विष घातले होते
- मिळालेल्या माहितीनुसार, अशोक(35) चा 21 जानेवारीच्या रात्री शेतात मृतदेह पडलेला मिळाला. कुटुंबीयांनी गावातील रामदास, हजरत आणि सुरेंद्रवर हत्येचा संशय वर्तवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तिघांचीही चौकशी केली. पहिल्या दिवशी कुटुंबीयांनी विजेच्या ट्रांसफॉर्ममधून विज घेतल्याने हजरत लोधीवर संशयाची सुई ठेवली. पण पोलिसांच्या चौकशीत हत्येमागे दुसरेच कोणी सुत्रधार असल्याचे समोर आले.

 

- या प्रकरणी आरोपी रामदास आणि त्याच्या पत्नीवर हत्येचे आरोप लावले आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कबुल केले की, त्याने नांगराच्या फाळाने अशाकच्या डोक्यात वार केले. 


- हल्ला झाला तेव्हा अशोकच्या तोंडात लाडू होता, आणि तो लाडू तसाच तोंडात राहिला. पतीने त्याचा गुन्हा कबुल केल्यावर पत्नीनेही कबुल केले की तिने लाडुत विष घालून त्याला मारण्याची प्लॅनिंग केली होती. 

बातम्या आणखी आहेत...