आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तास्थापनेनंतरही शिवसेना-भाजपतील ‘सोशल वॉर’ तीव्र, ४० हजार कोटी परत, महापोर्टलवरही ट्रोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

औरंगाबाद - राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुटल्यानंतर शिवसेना-भाजपमधील सोशल मीडिया वॉर अधिकच तीव्र झाले आहे. फेसबुक, ट्विटरवरून दोन्ही पक्षांचे अधिकृत अकाउंट तसेच समर्थककांकडून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवला जात अहे. नवीन राजकीय समीकरणांवर खिल्ली उडवत परस्परांना जाहीर आव्हानेही दिली जात आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीत रंगलेले सोशल मीडिया वॉर महाराष्ट्राने बघितले. सत्तास्थापनेनंतर आता हेच वॉर उलटले आहे. क्षणाक्षणाला बदलत गेलेली सत्ता समीकरणे, भाजपचे औटघटकेचे सरकार, शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती, सोनिया गांधी यांचे नाव घेत शिवसेना अामदारांनी घेतलेली शपथ, संजय राऊत यांचेे बाइट्स, उद्धव यांचा शपथविधी ते विधानसभेतील टाेलेबाजी, हे विषय सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. मीम्सचा महापूर आला आहे. अर्थात यात शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगतोय.

बोचऱ्या टीकेचा भडिमार

फेसबुकवर भाजपच्या सोशल अवेअरनेस ग्रुप, भाजप साेशल मीडिया वॉर रूम, एक कोटी देवेंद्र समर्थक, शिवसेना अधिकृत यासारख्या ग्रुप आणि वैयक्तिक अकाउंट्सवरून टीका करणाऱ्या पोस्टचा भडिमार सुरू आहे. एकेका ग्रुपवरून दिवसाला १५ ते २० तर  वैयक्तिक अकाउंटवरून सरासरी ८ ते १० पोस्ट टाकणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फेक अकाउंटवरून “एकाला हरवण्यासाठी ३ पक्ष एकत्र येतात. यातच विजय कोणाचा हे जनतेला समजले आहे,’ असा संदेश आहे. शपथविधीच्या बॅनरवरून शिवसेनाप्रमुखांचे हिंदुहृदयसम्राट हे विशेषण काढल्यावरही ऑनलाइन संताप व्यक्त करण्यात आला आहे. “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून बसलेत उद्धव ठाकरे,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया पाटील या तरुणीची अाहे. “जिनके घर शीशे के होते हैं वह दूसरों के घर पर पत्थर नहीं फेकते,’ ही  संजय राऊत यांची पोस्ट शेअर करताना राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी  “बस एक ही ठोकर में गिर जाएंगी दीवारे, अहिस्ता जरा चलिए शीशे के मकानो में,’ हा शेर टाकला आहे. अशाच अनेक पोस्टने युजर्सची करमणूक होत आहे, तर काही पोस्टमधून टीकेचा घसरलेला स्तरही दिसतोय.४० हजार कोटी परत, महापोर्टलवरही ट्रोल

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत करण्यावरून राजकारण तापले. तर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. सोमवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा चर्चा सुरू होत्या. या पोस्टलाही नेटकऱ्यांनी भरपूर ट्रोल केले.बातम्या आणखी आहेत...