आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

39 वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रसचा मुख्यमंत्री होण्यासाठी केली मदत होती, बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचे केले होते समर्थन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 53 वर्षात 5 मोठ्या प्रसंगी शिवसेना-काँग्रेसने एकमेकांना साथ दिली
  • सुप्रिया सुळेंना खासदार बनवण्यासाठी ठाकरे म्हणाले होते, "कमळाबाई तेच करेन, जे मी सांगेन."

नवी दिल्ली - राज्यात महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखरे शिवसेना-काँग्रे-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार स्थापन करत आहे. काँग्रेस आणि शिवसेनाची युती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात पाच वेळेस दोन्ही पक्षांनी एकमेकांचे समर्थन केले होते. या पाच प्रसंगात शिवसेना-काँग्रेसची मैत्री दिसून आली

शिवसेनेच्या पहिल्या निवडणूक सभेत काँग्रेस नेते सहभागी झाले होते


वैभव पुरंदरेंच्या 'बाळ ठाकरे अॅण्ड द राइज ऑफ शिवसेना' पुस्तकात लिहिले आहे की, शिवसेनेच्या पहिल्या निवडणूक सभेत त्या काळातील काँग्रेसचे मोठे नेते रामाराव अदिक सहभागी झाले होते. रामाराव आणि ठाकरे यांची मैत्री जुनी आहे. पुस्तकानुसार, बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की, आम्ही कम्युनिस्टांना हरवण्यासाठी एकत्र आलो आहोत. तर एप्रिल 2004 मध्ये सुहास पळशीकर यांनी 'शिवसेना : अ टायगर विथ मेनी फेसेस?' पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. 

कधीकाळी शिवसेनेला वसंत-सेना देखील म्हटले जायचे


राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सांगतात की, '1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाची पक्ष स्थापन केला होता. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे समर्थन मिळवले होते. यामुळे शिवसेनेला वसंत-सेना म्हटले जात होते.' तानपाठक सांगतात की, '1971 मध्ये शिवसेनेने कामराज यांच्या काँग्रेस सिंडिकेटच्या सहकार्याने आपली पहिली निवडणूक लढवली होती. यानंतर इंदिरा गांधीचा काँग्रेस गट पुढे काँग्रेसच्या रुपात अस्तित्वात आला.'
 

बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला उघडपणे समर्थन दिले

'बाळ ठाकरे अॅण्ड द राइज ऑफ शिवसेना' पुस्तकात लिहिले की, बाळासाहेब ठाकरे असे नेता होते ज्यांनी उघडपणे आणीबाणीचे समर्थन केले होते. इतकेच नाही तर माझा लोकशाही नाही तर ठोकशाहीवर विश्वास असल्याचे बाळासाहेब म्हणत होते. थॉमस हेनसेन लिखित 'वेजेस ऑप वायलेंस : नेमिंग अॅण्ड आयडेंटिटी इन पोस्टकोलोनियल बॉम्बे'च्या मते ठाकरेंनी आणीबाणीली समर्थन देत म्हटले होते की, देशात पसरलेल्या अस्थिरतेचा सामना करण्यासाठी एकमात्र उपाय असल्यामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती.  

काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी शिवसेनेने उमेदवार उभे केले नव्हते


वैभव पुरंदरेंच्या पुस्तकानुसार, 1977 मध्ये बाळासाहेबांनी बीएमसी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुरली देवडा यांना समर्थन दिले होते. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. 1980 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होताच राज्यातील सरकार बर्खास्त करण्यात आले आणि येथे पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अब्दुल रहमान अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. अंतुले आणि ठाकरे चांगले मित्र होते. यामुळे ठाकरेंनी या निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता आणि काँग्रेसला समर्थन दिले. 

2007 आणि 2012 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचे समर्थन केले


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री दिसली आहे. 2007 मध्ये शिवसेनाने एनडीए समर्थित भैरो सिंह शेखावत यांच्या ऐवजी यूपीएचे उमेदवार प्रतिभा पाटील यांना समर्थन दिले. याचप्रकारे 2012 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनाने यूपीएचे प्रणब मुखर्जी यांना समर्थन दिले होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर प्रणब मुखर्जी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर देखील गेले होते. 

शरद पवारांच्या मुलीला खासदार बनवण्यासाठी ठाकरे म्हणाले होते की, कमळाबाई तेच करेन, जे मी सांगेन 

बाळासाहेब ठाकरेंची फक्त काँग्रेसच नाही तर शरद पवारांसोबत चांगले संबंध होते. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात इतकी घनिष्ट मैत्री होती की, ठाकरेंनी सुप्रिया सुळेंविरोधात आपला उमेदवार उभा केला नव्हता. 


सप्टेंबर 2006 मध्ये शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळेंनी राज्यसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शरद पवार यांनी आपले आत्मचरित्र 'ऑन माय टर्म्स'मध्ये लिहिल की, बाळासाहेबांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले, ''मी ऐकतोय की, सुप्रिया निवडणूक लढवत आहे आणि तुम्ही मला सांगितले नाही. मला ही बातमी इतरांकडून का मिळतीये?'' यावर शरद पवार त्यांना म्हणाले की, "शिवसेना-भाजप युतीने अगोदरच तिच्या (सु्प्रिया) विरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे." यानंतर ठाकरे त्यांना म्हणाले की, "माझा कोणताही उमेदवार सुप्रिया विरोधात निवडणूक लढणार नाही. तुमची मुलगी ही माझी मुलगी आहे." यावर शरद पवार म्हणाले की, "याबाबत भाजपचं काय?" यानंतर बाळासाहेबांनी उत्तर दिले, "कमळाबाईची काळजी करू नका. ती तेच करेन, जे मी सांगेन."