आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने पत्ते उघडले; 23 पैकी 21 उमेदवारांची यादी जाहीर, औरंगाबादमधून परत एकदा खैरेंना उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या आधीच जाहिर केल्या होत्या. शिवसेनेने त्यांच्या 23 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांची यादी जाहिर केली असून उर्वरित दोन नावे रविवारी सांगण्यात येतील असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

 

शिवसेनेचे 21 उमेदवार

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर
4) ठाणे - राजन विचारे
5) कल्याण - श्रीकांत शिंदे
6) रायगड - अनंत गिते
7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत
8) कोल्हापूर - संजय मंडलिक
9) हातकणंगले - धैर्यशिल माने
10) नाशिक - हेमंत गोडसे
11) शिर्डी - सदाशिव लोखंडे
12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील
13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
15) बुलढाणा - प्रतापराव जाधव
16) रामटेक - कृपाल तुमाने
17) अमरावती- आनंदराव अडसूळ
18) परभणी- संजय जाधव
19) मावळ - श्रीरंग बारणे
20) हिंगोली- हेमंत पाटील
21) उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर

निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे अशा सात टप्प्यात लोकसभेचं मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

 

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...