आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने वाटले 70 उमेदवारांना एबी फॉर्म

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेनेने आपली अधिकृत उमेदवार यादी अजून जाहीर केलेली नाही. परंतु एबी फॉर्म दिलेल्या ७० उमेदवारांची यादी समोर आली असून यात आयारामांसह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, संजय राठोड, दादा भुसे या मंत्र्यांचा एबी फॉर्म दिलेल्यांच्या यादीत समावेश आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनाही शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली.

प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद मध्य) 
संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) 
अर्जुन खोतकर (जालना) 
राजश्री पाटील (नांदेड) 
एरंडोल पारोळा - चिमणराव पाटील 
संदीपान भुमरे (पैठण) 
ज्ञानराज चौगुले (उमरगा लोहार) 
संजय राठोड (दिग्रस) डॉ. राहुल पाटील (परभणी) 
डॉ. सुजीत मिणचेकर (हातकणंगले) 
प्रकाश आंबिटकर (राधानगरी) 
गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) 
किशोर पाटील (पाचोरा) 
राजाभाऊ वाजे (सिन्नर) 
अनिल कदम (निफाड) 
योगेश घोलप (देवळाली).

नवे चेहरे...
आदित्य ठाकरे (वरळी) 
प्रदीप शर्मा (नालासोपारा) 
अब्दुल सत्तार (सिल्लोड) 
भास्कर जाधव (गुहागर) 
जयदत्त क्षीरसागर (बीड) 
यामिनी जाधव (भायखळा) 
विठ्ठल लोकरे (गोवंडी) 
रमेश लटके (अंधेरी पूर्व) 
पांडुरंग सकपाळ (मुंबादेवी)
 

बातम्या आणखी आहेत...