आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई विधानसभा मतदारसंघातून सेनेचे माजी मंत्री पंडितांची बंडखोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार अॅड. लक्ष्मण पवार यांना भाजपने  पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची उमेदवारी कापली गेली. त्यामुळे पंडित यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.
 
मंगळवारी पंडित यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भावूक झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘आबा आपल्यावर अन्याय झाला असून कसेही उभे रहा आमदार तुम्हीच होणार’, असा विश्वास व्यक्त केला. पंडित हे अपक्ष म्हणून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदार संघातून शिवसेना भाजपला मदत करणार नसल्याचे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले आहे. बदामराव पंडित यांचे चिरंजीव युधाजित पंडित यांना अश्रू अनावर झाले.  गेवराई मतदार संघाची जागा शिवसेनेला सुटते की भाजपला याची उत्सुकता शिगेला पोहाेचली होती. 
 

शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नाहीत
गेवराईच्या महायुतीच्या उमेदवाराचा माझ्यासह कोणताही शिवसैनिक प्रचार करणार नाही. शिवसेना बदामराव पंडित यांच्या पाठीशी  उभा राहणार  आहे, असे सेनेचे जिल्हाप्रमुख  कुंडलिक खाडे यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदामराव पंडित यांना मंगळवारी मातोश्रीवर बोलावल्याचे खाडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...