आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ShivSena Government Will Come In The State, Final Decision Will Be Taken In Next Two Days Sanjay Raut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित, यामुळे विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही - शिवसेना नेते संजय राऊत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राज्यात सरकारस्थापनेसाठी महाशिवआघाडीत चर्चा सुरु आहे. बुधवारी रात्री दिल्ली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. रात्री आघाडीची बैठक संपली त्यामुळे आज शरद पवारांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरेंनी आघाडीतील प्रमुख नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोनिया गांधींना भेटण्याचे अजुन प्रयोजन नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित आहे. शेतकऱ्याला मदत करताना त्याची जार-धर्म पाहिला जात नाही. त्यामुळे धरनिरपेक्ष शब्दाला विरोध करण्याचा किंवा आक्षेप घेण्याच प्रश्न उद्भवत नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाआघाडीतील नेते सोनिया गांधीशी चर्चा करून बैठक घेत असल्यामुळे सोनिया गांधीची भेट घेण्याचे प्रयोजन नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाच सरकार येणार आहे. 1 डिसेंबरपूर्वी मुख्यमंत्री शपथविधीबाबत निर्णय होणार आहे. आज मुंबईत महाशिवआघाडीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदी आणि पवार यांच्या भेटीबाबत आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे ते म्हणाले.