आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यास मध्यस्थी करावी, शिवसेनेचे आरएसएसला पत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवणडुकीचे निकाल लागून 12 दिवस झाले, महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळाले... तरी शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. याच दरम्यान, आता शिवसेना नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र लिहून मदतीची विनंती केली आहे. राज्यात सरकारच्या 50-50 वाटपाला शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप तोडगा निघाला नाही. एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, अशात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्ग काढावा असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जवळिक मानले जाणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाला हे पत्र पाठवले आहे. यामध्ये भाजप युतीधर्म पाळत नसल्याचे आरोप देखील करण्यात आले आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रातून तिवारी म्हणाले, "राज्याच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला आहे. परंतु, भाजप युतीधर्म पाळत नाही. त्यामुळेच, सरकार स्थापनेला राज्यात विलंब होत आहे. अशात आरएसएसने दाखल देऊन यावर तोडगा काढावा." यावर संघाने काय प्रतिक्रिया दिली हे अद्याप समोर आले नाही.

24 ऑक्टोबर रोजी लागलेल्या निकालात एकत्रित निवडणूक लढणाऱ्या शिवसेना-भाजपच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु, शिवसेनेने 50-50 अशा सरकारच्या वाटपाची मागणी केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याची मागणी आहे. भाजपने निवडणुकीपूर्वीच हे आश्वासन दिले होते. आता मात्र नकार देत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. परंतु, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नमती भूमिका घेतली होती. परंतु, आता माघार घेणार नाही असे शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून सांगण्यात आले आहे.