आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून शिवसेनेचे आमदार राहणार हॉटेलमध्ये, भाजपकडून फोडाफोडी करण्याची भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपकडून शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात होते. यावर आमच्या आमदाराकडे फिरकण्याची कोणाचाही हिंमत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. यासोबतच भाजपने शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी 12 तासांचा अल्टिमेटम दिल्याचे वृत्त होते. याबाबत बोलताना आम्ही कोणाचाही अल्टिमेटम मानत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. आज गुरुवारी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आलेल्या विविध बातम्यांसंबंधात त्यांनी उत्तरे दिली.  

तसेच बहुमताचा आकडा असेल तर सत्ता स्थापन करा असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपला केले आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याच्या बातम्या आहेत. यामुळे शिवसेनेच्या सर्व 54 आमदारांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना संजय राऊतांनी हे वृत्त फेटाळले आहे. दुसऱ्या पक्षातील आमदार भाजपकडून फोडले जात आहेत. काही जण आम्हाला संपर्क करत असल्याची माहिती विरोधी पक्षातील आमदारांनी आपल्या कानावर घातल्याचे राऊतांनी सांगितले. दरम्यान आमच्या आमदाराकडे फिरकण्याची कोणाचीही हिंमत नाही. आमचे आमदार एकनिष्ठ आहेत असेही राऊत यावेळी म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...