आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर हबीब जालिब यांचा एक शेर ट्वीट करून भाजपवर निशाणा साधाला आहे.
मुखपत्र सामनातून भाजपवर हल्लाबोल
शिवसेनेचे मुखपत्र सामनात शेतकरी प्रश्नांवर प्रकाशित लेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर फक्त 8 हजार रुपये भरपाई देण्यात येत आहे. ही रक्कम तुटपुंजी असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी सामनातून करण्यात आली आहे. सोबतच जनतेने भाजपला मतदान केले नाही म्हणून केंद्र सरकारला शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. असेही या लेखातून सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.