आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेत नाराजी, संजय राऊत यांचे बंधू राजीनामा देण्याच्या तयारीत?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अॅड अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. यामुळे आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. माझ्यावर अन्याय झाला अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली होती. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेत राजकीय नाट्य सुरु झाले आहे.31 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे देणार राजीनामा ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राऊत हे सध्या अज्ञातस्थळी आहेत. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे उद्या (31 डिसेंबर) ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देणार असल्याचेही बोलले जात आहे. सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघाचे आमदार आहेतमहाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका
 
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेसाठी संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती.

बातम्या आणखी आहेत...