आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाला विचारून बाबरीचा ढाचा तोडायला गेलो नाही, संजय राऊत यांचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - शिवसेनेचे प्रवक्‍ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्‍येच्‍या मुद्द्यावरून वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. 'अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. मोदी सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्‍यादेश काढून मंदिराचे काम सूरू करावे. सुप्रीम कोर्टात सुनावणीद्वारे हा प्रश्‍न सुटणार नाही', असे त्‍यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी ते नंदूरबारला आले होते.  

 

यावेळी संजय राऊत म्‍हणाले, '25 वर्षांपुर्वी आम्ही बाबरी मस्जिदचा ढाचा तोडायला गेलो, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विचारुन गेलो नाही, बाळसाहेबांच्या आदेशाने गेलो. अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे. तो कोर्टात सुटणार नाही.'  न्यायालय अलीकडे अनेक गोष्टींवर मत मांडते. त्यापासुन त्यांनी दुर रहायला पाहीजे, असे मतही त्‍यांनी यावेळी मांडले.  

 

या पत्रकार परिषदेत संजय राऊत सेना-भाजपा युतीवरही भाष्य केले. शिवसेनेची स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ते म्‍हणाले, 'भाजपाने 2014 मध्ये शिवसेनेसोबतची युती तोडली. तेव्हा दानवेंना निवडणुकासोबत लढवण्याचा सु-विचार का सुचला नाही. आता 2014पासून पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे. म्‍हणून आमच्या पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे'. येत्या काळात पक्ष संघटन जिल्ह्यात मजबूत दिसेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...