आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राउत म्हणाले - बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याच खोलीत भाजपसोबत 50-50 फॉर्म्युलावर चर्चा झाली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत बुधवारी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत त्यांनी मौन बाळगले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. बाळासाहेबंची शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याच खोलीत भाजपसोबत 50-50 फॉर्मुलावर चर्चा झाली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या कोणीतरी दरी निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत रूग्णालयातून परत आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. 

आम्हाला पंतप्रधानांचा अपमान करायचा नव्हता 


विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होतील असे मी आणि नरेंद्र मोदी नेहमी म्हणत होतो. मात्र त्यावेळी शिवसेनेने का आक्षेप घेतला नाही असे अमित शहा म्हणाले होते. यावर मोदींनी देवेंद्रजींचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख मान्य आहे. मात्र अमित शहांकडून मी तसे कधी ऐकले नाही. आम्ही नरेंद्र मोदींचा आदर करतो. आम्हाला त्यांना खोटे पाडायचे नव्हते. भाजपला त्यांच्या मान-अपमानाची काळजी नसली तरी आम्हाला आहे. तसेच शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे उद्धव ठाकरे सर्व सभांमध्ये वारंवार सांगत होते, असे राऊत म्हणाले. 

बंद दाराआडची चर्चा ही बाळासाहेबांच्या खोलीत झाली
 
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. ही चर्चा बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत झाली होती. ती आमच्यासाठी खोली नसून मंदिर आहे. शपथ घेऊन सांगतो की याच खोलीत भाजपसोतब 50-50 फॉर्मुलावर चर्चा झाली होती. या बंद खोलीतील चर्चा भाजपने मान्य केल्या नाहीत त्यामुळे आम्हाला त्या बाहेर आणाव्या लागल्या. असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे. बंद खोलीतला विषय महाराष्ट्राच्या स्वाभीमानाचा, तसेच भविष्याचा होता असेही ते यावेळी म्हणाले. 

मोदींबद्दल बोलतांना संजय राऊतांची भाषा बदलली
दरम्यान पंतप्रधान मोदींवर आमचं मनापासून प्रेम आहे. नरेंद्र मोदी प्रचारासाठी जेव्हा राज्यात आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाऊ असा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणीतरी दरी निर्माण करत आहे. बंद दाराआडा झालेली चर्चा शहांनी मोदींपर्यंत पोहोचवली नाही का असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...